Ad will apear here
Next
रत्नागिरीत १९ एप्रिलला रंगणार ‘गीतरामायण’
‘बाबूजी-गदिमा’ यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य
रत्नागिरी : सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त इंद्रधनुष्य यांच्या वतीने गीतरामायणाचा कार्यक्रम १९ एप्रिल २०१९ रोजी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमात अनुराधा गोखले, सिद्धी बोंद्रे, अभिजित भट आणि श्रीरंग भावे आदी गायक बाबुजींच्या चालींनी अजरामर ठरलेली गीतरामायणातील गीते सादर करणार आहेत. त्यांना सचिन भावे, मिलिंद टिकेकर (तबला), चैतन्य पटवर्धन (संवादिनी), उदय गोखले (व्हायोलिन), वैभव फणसळकर (की-बोर्ड), हरेश केळकर (तालवाद्य) हे संगीतसाथ करणार आहेत. एस कुमार साउंड सर्व्हिसेसचे ध्वनिसंयोजन असून, कार्यक्रमाच्या प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध आहेत. 

या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘इंद्रधनुष्य’तर्फे करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZOEBZ
Similar Posts
‘त्रिवेणी’ संगमात रसिकांना शब्द-सुरांचे स्नान रत्नागिरी : सप्तसूर म्युझिकल्स आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने आयोजित केलेल्या संगीतमय ‘त्रिवेणी’ संगमात रत्नागिरीकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य
गदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना त्रिवेणी कार्यक्रमातून मानवंदना रत्नागिरी : गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके म्हणजेच बाबूजी आणि अष्टपैलू कलाकार पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्राची दैवतं. अशा या त्रयीचा जन्मशताब्दी महोत्सव यंदा साजरा होत आहे. या त्रिमूर्तीमधील समान धागा म्हणजे यांचे संगीतातील अमूल्य योगदान. हाच धागा पकडून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी
अजरामर गीत रामायण भारतीयांच्या मनात रामायणाबद्दल नितांत श्रद्धा आहे. श्रीराम चरित्राने समाजजीवनावर अनेक संस्कार घडविले आहेत. हा संपूर्ण रामकथा गीतांमधून साकार करण्याची कल्पना आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे तत्कालीन सहनिर्देशक सीताकांत लाड यांना सुचली. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यावर गीते लिहिण्याची व सुधीर
नगर वाचनालयातर्फे कथाकथन व निबंधलेखन स्पर्धा रत्नागिरी : सध्याचे वर्ष हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे (पुलं), आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर (गदिमा) व संगीतातील अध्वर्यू व्यक्तिमत्त्व सुधीर फडके (बाबूजी) या त्रयीच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातर्फे निबंध व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language